Thackeray Brothers - Sharad Pawar : मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला ठरला?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers - Sharad Pawar) आगामी महापालिका निवडणुकासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच आता मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत असून या युतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 120 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून 40 उमेदवार यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. अद्याप ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी युतीकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली नाही.
Summery
मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला ठरला
या युतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा सोडण्यात येणार
ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत १२० जणांना एबी फॉर्म देण्यात आलेत
