दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना; चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना; चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले

दिवाळीच्या पहिल्या दिवशी खैराव येथे मोठी दुर्घटना, चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले. अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.
Published by :
shweta walge
Published on

पंढरपूर; आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यातील खैराव येथे एक दुर्घटना घडली आहे. चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील असून ऊसतोड साठी या भागात आले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून अद्याप या पैकी एकाचाही शोध लागलेला नाही.

या दुर्घटनेत बुडलेल्या मध्ये शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ हे ऊसतोड मजूर आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऊसतोड कामगारांची टोळी जगदाळे वस्ती, खैराव ता माढा या ठिकाणी आली होती. जवळच सीना नदीवर हे चौघे कुटुंबातील इतर सदस्यासह आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्यास वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडू लागल्याने इतर दोघेही पाण्यात उतरले सीना नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोन तासानंतरही अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com