Crime
CrimeTeam Lokshahi

कोल्हापुरात हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली लाखो रुपयाची फसवणूक

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातील सुमारे दीड हजार स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले होते. विजेत्यांना ३० लाख रूपयांची बक्षिसं दिली जाणार होती.

सतेज औंधकर | कोल्हापूर : शाहूपुरी येथे ऑफिस थाटून कमांडो हाफ मॅरेथॉन २०२२ च्या नावाखाली एका तरूणानं फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. वैभव पाटील असे तरुणाचे नाव असून १६ ऑक्टोबर रोजी तपोवन येथून या स्पर्धेला सुरूवात होणार असल्याची जाहिरात त्यानं सोशल मीडियावरून केली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातील सुमारे दीड हजार स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, संयोजकांनी त्यांच्याशी संपर्क केला नसल्यानं रात्री त्यांचा उद्रेक झाला. या तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्यानं अखेर आयोजकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी स्पर्धेसाठी आलेल्या तरूण-तरूणींकडून करण्यात आली.

Crime
कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश! हत्या, तडीपारसारखे तब्बल 11 गुन्हे दाखल

कोल्हापुरातील वैभव पाटील या तरूणानं शाहूपुरी बेकर गल्ली परिसरात मराठा कमांडो सिक्युरिटी इंटलिजेन्स मॅन पॉवर्स फोर्स या नावानं वेबसाईटवर हाफ मॅरेथॉनची माहिती टाकली होती. तसंच त्या पॅम्पलेटवर एमसीएसएफ वेल्फअर फाउंडेशन, कमांडो हाफ मॅरेथॉन २०२२ असा उल्लेख करून कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आज स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती अपलोड केली होती. वेगवेगळया गटातील विजेत्यांना ३० लाख रूपयांची बक्षिसं दिली जाणार असल्याचंही त्यानं जाहीर केलं होतं. त्यावरून मुंबई, दिल्ली, बिहार, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम यासह विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंनी जाहिरातीतील मोबाईल नंबरवर संपर्क करून, स्पर्धेविषयी अधिक माहिती घेतली. २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतराची स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५०० ते २ हजार रूपये फी आकारण्यात आली होती. अशा ९०० स्पर्धकांची नोंदणी या फाउंडेशनकडं झाली होती.

Crime
अजित पवारांच्या अडचणी वाढणार! महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु होणार?

देशभरातील स्पर्धक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी राहण्यासाठी लॉज, यात्रीनिवास बुक केले. जेवणा-खाण्याचा खर्चही केला. टाकाळा येथील व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवनाच्या मैदानावर हे स्पर्धक दिवसभर थांबून होते. मात्र, सायंकाळपर्यंत यातील काहींना फक्त टी-शर्ट आणि स्पर्धेसाठी चिप उपलब्ध झाली. त्यानंतर संयोजकांचे फोन स्वीचऑफ झाले. त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली होत नसल्यानं, सायंकाळी मात्र स्पर्धकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली व आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com