FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; शनिवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू
राज्यातील सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत आज जाहीर करण्यात आले आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. या पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
संकेतस्थळ : https://11thadmission.org.in
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ?
- 14 ऑगस्ट पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून
- 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशसाठी अर्ज भाग – 1 भरता येणार
- विद्यार्थ्यांना फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी जवळच्या कॉलेज, मार्गदर्शक केंद्रावर जाऊन व्हेरिफाय करावे
- 17 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यत
- विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे
- यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत
- या दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल
- 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होणार
- अर्जात विद्यार्थ्यांना सुधारणा करण्याची असल्यास या दरम्यान वेळ दिला जाणार
- 25 ऑगस्टला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार
- 27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
- विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळणार
- पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार
- 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत
- विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेले पसंतीचे कॉलेज निश्चित करायचे आहे
- अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल
- 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादी साठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील