Kolhapur: अंबाबाई देवीचे गाभारा दर्शन आज बंद

Kolhapur: अंबाबाई देवीचे गाभारा दर्शन आज बंद

आज अंबाबाई मंदिरातील गाभारा स्वच्छतेमुळे देवीचे दर्शन बंद करण्यात आल आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे. आज अंबाबाई मंदिरातील गाभारा स्वच्छतेमुळे देवीचे दर्शन बंद करण्यात आल आहे.

सकाळी साडेआठची आरती झाल्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत गाभाऱ्यातील स्वच्छता केली जाणार असल्याने हे दर्शन बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आज उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छतेला सुरूवात केली आहे. गाभारा स्वच्छतेमुळे देवीचे दर्शन बंद राहणार. सकाळी 8.30 वा.पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com