Ganpatrao Deshmukh । ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Ganpatrao Deshmukh । ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Published by :
Published on

शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशय खडे आहेत. त्यावरचं त्यांचं ऑपरेशन पार पडलंय. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती होती.मात्र उपचारादरम्यानच ज रात्री 9:30 च्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झाले.

  चालते बोलते विद्यापीठ गमावले – राज्यपाल

"राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हंटले.

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री

राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com