सांगलीत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, गणेशमूर्तीकारही सज्ज

सांगलीत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, गणेशमूर्तीकारही सज्ज

Published by :

सांगलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कोल्हापूर,पुणे मुंबई येथील सुबक आकर्षक रुपातील गणेश मुर्त्या दाखल झाल्या आहेत. सांगलीत गणेशोत्सव पार्श्वभूमीवर चार फुटांच्या आतील गणेश मुर्तीचे स्टॉल मिरजेत लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे सांगली मिरजेतील स्थानिक गणेश मूर्ती सोबत सोलापूर कोल्हापूर, येथून ही गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या.

आता मुंबई व पुणे येथून ही  विविध, आकर्षण मोहक विविध रूपातील  वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती विक्रीला आल्या आहेत. गणपतीच्या विविध रुपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सद्या सर्वांचे आकर्षण ठरत आहेत.

गणेश मुर्ती स्थापनेच्या ठिकाणी केली जाणारी सजावटची साहित्याचे  स्टॉल मिरजेत सजले आहेत. थर्माकॉल मखराला यावेळी बगल देऊन पर्यावरण पूरक असे कागदी मखर पहिल्यांदा मिरजेत विक्रीला आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com