Tinderचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

Tinderचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

Published by :

निकेश शार्दुल
Tinder आणि JAUMO सारखे सोशिअल मिडीया ॲपचा वापर करत हनी ट्रॅपच्या माध्यमातून तरूणांची फसवणुक करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केलीये. सबंधित टोळी ही टिंडर या ॲपवरून सुरूवातीला ओळख वाढवत शरिरसुखाचं प्रलोभन देत होती. अश्या प्रकारे ओळखी करत सबंधित तरूणाला नियोजित स्थळी बोलावून त्याला दमदाटी आणि मारहाण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळले जात होते.

आत्तापर्यंत या प्रकरणात ६ जणांना अटक केली गेली असून अद्यापही तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये ३ महिलांचा देखील समावेश आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात ॲानलाईन सेक्सॅार्टिझम आणि हनी ट्रॅपसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून नागरिकांनी अश्या प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहनही ठाणे पोलिसांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com