Ganpatrao Deshmukh । ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Ganpatrao Deshmukh । ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Published by :
Published on

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून एक दोन नव्हे तर तब्बल ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सोलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षाचे होते. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहीली आहे. उद्या शनिवारी पहाटे 4 वाजता त्यांचे पार्थिव सांगोला कडे नेण्यात येणार असल्याची माहिती नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी दिली आहे.

गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशय खडे आहेत. त्यावरचं त्यांचं ऑपरेशन पार पडलंय. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती होती.मात्र उपचारादरम्यानच ज रात्री 9:30 च्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झाले.

राजकीय कारकीर्द

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com