Gateway To Mandwa Waterway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा; गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद
थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद
सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार
(Gateway To Mandwa Waterway ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे आज मुंबई गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा ही जलवाहतूक सेवा दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान मोदी हे राजभवन आणि ताज हॉटेल येथे भेट देणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचं मेरी टाइम बोर्डाकडून सांगण्यात आलं. या वेळेत गेटवे ऑफ इंडिया परिसरात कोणत्याही जलवाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.
या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सर्व प्रवासी बोटींची वाहतूक पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.