राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार आहे. जूनपासून राज्यातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नसल्याची माहिती मिळत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांपासून हे लागू करण्यात येणार आहे.

800 अभ्यासक्रमांसाठी सवलत लागू राहणार आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी योगशास्त्र विभाग व शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com