बापरे बाप! सोनं 81000 हजार पार; तर चांदी  थेट 1 लाखाच्या पुढे,  चेक करा लेटेस्ट रेट

बापरे बाप! सोनं 81000 हजार पार; तर चांदी थेट 1 लाखाच्या पुढे, चेक करा लेटेस्ट रेट

सोन्याचा भाव 81,000 पार, चांदी 1 लाखाच्या पुढे. दिवाळीच्या आधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी उसळी. आजचे ताजे दर तपासा.
Published by :
shweta walge
Published on

सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीला विशेष पसंती असते. मात्र दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या किंमती गगनाना भिडताना दिसत आहेत. आज (23 ऑक्टोबर) पुन्हा एकदा सोने आणि चांदी च्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भावाने 81 हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. तर चांदीच्या दरानेही भारतीय बाजारांमध्ये 1 लाख रुपये प्रति किलो पर्यंत मजल मारली आहे.

सोन्या-चांदीचे दर सध्या आकाशाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वीच सोने पुन्हा एकदा ऑलटाइम हायवर पोहोचले आहेत. आज जीएसटी सह 10 ग्रॅम सोन्याचा दर 81000 पार पोहचला आहे. तर, चांदी 102125 रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षात सोन्याचा दर तब्बल 15351 रुपये तर चांदीने 25756 रुपयांची उसळी घेतली आहे

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 452 रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढून 78703 रुपयांच्याही पुडे गेला आहे. तर, चांदी 779 रुपये प्रति किलोने वाढून 99151 रुपये प्रति किलोवर खुली झाली.

शुक्रवारी चांदीचा भाव 99,500 रुपये प्रति किलोग्रॅम होता. त्यानंतर आता सलग पाचव्या दिवश चांदीचा दर वाढला असून तो 1.01 लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

बापरे बाप! सोनं 81000 हजार पार; तर चांदी  थेट 1 लाखाच्या पुढे,  चेक करा लेटेस्ट रेट
Dhanteras Diwali 2024: 'या' कारणामुळे धनत्रयोदशीला लावला जातो यमच्या नावाने दिवा; जाणून घ्या.

सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात भारतभरात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com