महाराष्ट्र
श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी; देवीचे रूप पाहण्याकरिता भक्तांची गर्दी
अमोल धर्माधिकारी, पुणे
दस-याच्यानिमित्ताने सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी असून वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केलीय