महाराष्ट्र
Gold-Silver Price | पाहा आजचे सोन्याचे भाव
सध्या डॉलरचा भाव अस्थिर असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारात अस्थिर आहेत. त्यामुळे आज भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले तर चांदीचा दर वाढला. दिल्ली सराफात सोन्याचा दर 66 रुपयांनी कमी होऊन 46,309 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 332 रुपयांनी वाढून 67, 248 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,782 डॉलर तर चांदीचा दर 26.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.