पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

येत्या 27 ऑक्टोबर 2024पासून आंतरराष्ट्रीय उड्डाण पुणे-दुबई-पुणे आणि पुणे बँकॉक -पुणे सुरु होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. आता येत्या 27 ऑक्टोबर 2024पासून आंतरराष्ट्रीय उड्डाण पुणे-दुबई-पुणे आणि पुणे बँकॉक -पुणे सुरु होत आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार आहे. याचा फायदा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे. पुणे-दुबई-पुणे ही थेट विमानसेवा दररोज उपलब्ध होणार असून पुणे-बाणकोक-पुणे विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस असणार आहेत. येत्या 27 ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरु होणार आहे.

पुणे-बॅंकॉक विमान सेवा पूर्वी सुरु होती. मात्र कोव्हीडच्या काळात ती बंद करण्यात आली असून अद्याप सुरु केली नव्हती. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरु झल्याने हिवाळ्यात पुण्यातून थेट उड्डाण सेवेचा लाभ पुणेकर घेऊ शकतात. यंदाच्या विंटर शेड्युल मध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार असल्याचे मोहोळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com