शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी, त्यांना कोण मोठं मानणार?

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी, त्यांना कोण मोठं मानणार?

Published by :
Published on

भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत.त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्यांचं देणंघेणं नाही, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं त्यांनी नमूद केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com