सरकारने केली खाद्य तेलाच्या किमतीत घट

सरकारने केली खाद्य तेलाच्या किमतीत घट

Published on

सणासुदीच्या तोंडावर जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या किरकोळ किमती कमी केल्या आहेत. केंद्र सरकारनं शुक्रवारी (5 नोव्हेंबर) कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयातशुल्क हटवलं आहे.

सरकारनं या खाद्य तेलांवर लावलेलं आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणलं आहे. त्याशिवाय या सर्व तेलांवर लावण्यात आलेला कृषी सेसही कमी करण्यात आला आहे. कच्च्या पाम तेलावर असलेला कृषी सेस 20 टक्क्यांवरून घटवून 7.5 टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील सेस 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही अधिसूचना शनिवारपासून लागू झाली आहे. अनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या किंमतीत २०,१८,१०, ७ रुपयांपर्यतची घसरण नोंदवण्यात आली आहे. पामतेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सुर्यफूल तेल आणि सर्वच प्रमुख खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.

खाद्य तेलाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक आहेत. मात्र ऑक्टोबरपासून घसरण पाहायला मिळत आहे. सरकार इतर खाद्य तेल आणि विशेषतः राइस ब्रॅनचं उत्पादन अधिक वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.गेल्या काही महिन्यांत खाद्य तेलाच्या दरानं अनेक नवनवीन विक्रम मोडीत काढल्याचं पाहायला मिळालं

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com