Bhagat Singh koshyari
Bhagat Singh koshyari

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. तब्बल ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोठ्या बंदोबस्तात मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे. आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार असून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु, त्याआधीच राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंसह गुजरातच्या सूरतहून सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहेत. अशातच त्यांनी राज्यपालांकडे वेळ मागितल्याने महाविकास आघाडीला बहुमत सिध्द करावे लागणार आहे. परंतु, त्याआधीच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोना झाला असून त्यांना रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे किमान सात दिवस तरी आता एकनाथ शिंदे यांना राज्यपालांना भेटता येणार नाही.

दरम्यान, आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. "बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com