महाराष्ट्र
मुरबाडमध्ये ग्रामसेवकाला अटक
ग्रामसेवक राजेश देशमुख याने नोंदवह्या, कामकाजाचे रजिस्टर्स,चेक बुक , शिक्के असे ग्रामपंचायतीचे सर्व दप्तरच चोरले होते , तसेच सरपंच देसले यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून ग्रामसेवक देशमुख याने ग्रामपंचायतीच्या बँक खात्यांमधून लाखो रूपये लंपास केल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे या ग्रामसेवकाने अन्य ग्रामपंचायतींमध्येही घोटाळे केले असून त्या सर्वांची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी साजई गावचे सरपंच दीपक देसले यांनी केली. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.