Shinde- Fadnvis cabinet
Shinde- Fadnvis cabinetTeam Lokshahi

शिंदे- फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, भाजपचं पारडं जड

संजय राठोड यवतमाळचे तर संदिपान भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात अभूतपूर्व गोंधळानंतर नवीन शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार पार पडले. या मंत्रिमंडळावर टीका होत असतानाच, राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आता तब्बल दीड महिन्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून जिल्हानिहाय पालकमंत्री निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com