Gunaratna sadavarte Team Lokshahi
महाराष्ट्र
गुणरत्न सदावर्ते 18 दिवसानंतर जेलमधून बाहेर
अॅड गुणरत्न सदावर्तेचा 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) 18 दिवसानंतर जेलमधून बाहेर आले आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्तेने (Gunaratna Sadavarte) 'हम है हिंदुस्थानी'च्या घोषणा दिल्या.
मुंबई उच्च न्यायालयाने अॅड गुणरत्न सदावर्तेचा (Gunaratna Sadavarte) अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आर्थर रोड जेलमधून सदावर्तेची सुटका झाली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी तब्बल 18 दिवसानंतर कारागृहाबाहेर पडले आहे. यापुढेही आपला लढा सुरूच राहिल असे सदावर्ते यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हटले आहे.