Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : ठाकरे बंधूच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Gunaratna Sadavarte) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यातच काल ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केला. या जाहीरनाम्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.

जाहीरनामा आचार संहितेत बसत नाही म्हणून तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत भाषेच्या आधारावर महापौर म्हणून विरोध करता येणार नाही उत्तर भारतीय गुजराती महापौर होऊ शकतो असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Summary

  • ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केला

  • ठाकरे बंधूच्या जाहीरनाम्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

  • जाहीरनामा आचार संहितेत बसत नाही म्हणून तक्रार करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com