Gutkha company owners : गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागण्याची शक्यता; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कडक निर्देश दिल्याची माहिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Gutkha company owners) गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कडक निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले असून गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाईचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आले आहे.
मुंबईत ही गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधीत गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवेध व्यवसायातील सूत्रधारांवरच कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असं निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागणार?
मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती
गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाईचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आले
