“चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे”

“चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे”

Published by :

अजित पवारांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे नाहीतर आम्ही सुद्धा फाटक्या तोंडचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटीलांनी अजित पवारांना दिला. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी 'चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे.' असे वादग्रस्त विधान केले आहे. हसन मुश्रीफ यांच्या या धक्कादायक वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मुश्रीफ यांच्यातील हा वाद वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हसन मुश्रीफ यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील यांनी दिल आहे. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करून मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे ते म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com