त्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी, पुढे काय घडले ते वाचा

त्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी, पुढे काय घडले ते वाचा

पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
Published by :
shweta walge
Published on

पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र उडी मारलेल्या या युवकाला पोलिस व अग्नीशमन जवानांनी आश्चर्यकार करित्या झेलत त्याचे प्राण वाचवले आहे. उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्यावर अलगद झेलून जवानांनी धाडसाचं काम केलंय.

आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज परिसरातील नागरिकांनी अनुभवला. पोलिस आणि अग्नी शमन जवानांनी आत्महत्येसाठी चौथ्या मजल्या वरून उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्या वर अलगद झेलून मृत्यूलाही परतपाठवण्याचा भिम पराक्रम केला. जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलिस आणि अग्नीशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरुणाचे नाव विवेक पारखी, (वय २१ वर्षे, रा. मूळगाव नेपाळ) याने गुरुवारी सकाळी आठ वाजता अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड काँलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांना कळताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले. बचाव पथक अत्यंत त्वरेने हालचाल करत घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत असंख्य लोक खाली गोळा होऊन हल्लाकल्लोळ करू लागले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com