आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा पोलीस अधीक्षकांवर दबाव; व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या वरती दबाव टाकत असतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. तुम्हाला एक पाठवलंय नो compramise, नंतर च नंतर बघू त्याला आज ऑर्डर काढा , नो डीसकस मी सांगतो ते करायचं असं सांगत मी मुख्यमंत्र्यांचं असल ऐकत नसल्याचे तानाजी सावंत या व्हिडिओत बोलत असून तुम्हाला सांगितलं तेच करायचं , पुन्हा उचलून फेकू काही राडा घातला तर त्याला काय आपणच करणार आहोत. असे सावंत या व्हिडीओ क्लिप मध्ये म्हणत आहेत.
हा दबाव टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसांत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वासुदेव मोरे या पोलीस अधिकाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवैध दारू विक्रीला पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत गृहमंत्र्यांच्या आदेशाने मोरे यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.