Local body Elections : 50 टक्के मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर करा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Local body Elections) आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पार पडली. राज्यातील 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर, चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. यासोबतच 50 टक्के मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर करा असे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सुनावणी लांबल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
स्था. स्व. निवडणुकांबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी
50 टक्के मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर करा
सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश
