NCP : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतच्या 21 जानेवारीला होणार सुनावणी; विधानसभा अध्यक्षांच्या 'या' निर्णयाला जयंत पाटील यांचे आव्हान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत 21 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी एकाचवेळी घेणार आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ आणि चिन्हासंदर्भात शरद पवार यांनी याचिका केली आहे. तर यासोबतच अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे.
शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय राष्ट्रवादीची सुनावणी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
दोन्ही राष्ट्रवादी चिन्हाच्याबाबत 21 जानेवारीला सुनावणी होईल
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ आणि चिन्हासंदर्भात शरद पवार यांनी याचिका केली
शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय राष्ट्रवादीची सुनावणी घेणार
