Navneet Ravi Rana : राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या खटल्यावर उद्या सुनावणी
मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यावर (Navneet Ravi Rana) राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राणा दांपत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राणा दांपत्याकडून (Navneet Ravi Rana) मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयपीसी कलम 124 A मध्ये दंडाधिकारी कोर्टाला जामीनाचे अधिकारच नसल्यानं तो मंगळवार सकाळपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात पहिल्याच सत्रात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.
राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या दोन वेगवेगळ्या एफआयआरना एकत्रित करुन एकच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका राणांनी केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.