Nanded
Nanded

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ आली असून पूर परिस्थिती कायम
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान

  • गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ आली असून पूर परिस्थिती कायम

  • पंचवटी नगरात अनेक कुटुंबाच्या घरात शिरले पाणी

( Nanded Rain Update ) राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.

यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. गोदावरी नदी धोक्याच्या पातळी जवळ आली असून नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

गोदावरी नदीवरील नाव घाटचा पूल पाण्याखाली गेला असून नांदेड शहरातील वसरणी भागातील पंचवटी नगरात अनेक कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. पंचवटी नगरातील आठ कुटुंबांना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केलं आहे.

विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडले असून धरणातून जवळपास दीड लाख क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावाला आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com