Nagpur Rains
Nagpur Rains

Nagpur Rains : नागपुरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Nagpur Rains ) राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी साचलं असून याच पार्श्वभूमीवर सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागपूरच्या नरेंद्र नगर येथे पाणी साचल्याने एका बाजूने वाहतूक बंद तर दुसऱ्या बाजूने प्रशासनाकडून पंपाने पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सद्यस्थितीत नागपुरात 172.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com