Mumbai Goa highway
Mumbai Goa highway

Mumbai Goa highway : आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

आज पासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. .
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Goa highway) आज पासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणवासीय कोकणात जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये तसे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

23 ते 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी दिवसभर तसेच 6 व 7 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी राहणार आहे. महामार्गावर अपघात झाल्यास वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

तसेच वाहनदुरुस्ती पथकही सज्ज असणार असल्याची माहिती मिळत आहे. या बंदीमधून दूध, औषधे, इंधन भाजीपाला, नाशिवंत माल अशा साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com