नाशकात आजपासून हेल्मेटची सक्ती

नाशकात आजपासून हेल्मेटची सक्ती

Published by :
Published on

नाशिक शहर पोलिसांनी हेल्मेट सक्तीसाठी विविध क्लुप्त्या लढवल्या. यामुळे अनेक चांगले परिणाम दिसू लागले आहेत. नो हेल्मेट नो पेट्रोल (No helmet no petrol), नो हेल्मेट नो कॉपरेशन (No helmet no coopration) यासह दुचाकीस्वारांचे समुपदेशन करणे (bike riders counseling), दुचाकीस्वारांना परीक्षा (Examination) अनिवार्य करण्यात आल्यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

असे असले तरीदेखील हेल्मेट सक्ती अजून पूर्णपणे झालेली दिसत नाही. मात्र आता नाशिक पोलिसांनी आजपासून हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांच्याकडून ही कारवाई आजपासून नाही तर गुरुवारी (दि २०) पासून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com