महाराष्ट्र
महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळ यांची भेट घेणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आता महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
भुजबळ यांचंही नाव नाशिक लोकसभेसाठी चर्चेत होते. हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांची काल भेट झाली नव्हती. हेमंत गोडसे प्रचारात असल्यानं भुजबळ यांच्यासोबक त्यांची भेट झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या भेटीत हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यात काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.