Nagpur
Nagpur

Nagpur : नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हायअलर्ट; जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला?

आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nagpur ) आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर नागपुरात गुप्तचर यंत्रणांकडून हायअलर्ट देण्यात आला असून जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन सिंदूर’नंतर जेम जैश ए मोहम्मदकडून कडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांकडून इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॉम्बशोधक पथकांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधील RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक ठिकाणे गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असणार आहे. SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण 10 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Summery

  • नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हायअलर्ट

  • जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला?

  • विधानभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com