High Court on Potholes Deaths
High Court on Potholes Deaths

High Court on Potholes Deaths : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई मिळणार; उच्च न्यायालयाचे आदेश

नुकसान भरपाई दोन महिन्यांच्या आत वितरीत करण्याचे कोर्टाचे निर्देश
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई मिळणार

  • उच्च न्यायालयाने दिले आदेश

  • नुकसान भरपाई दोन महिन्यांच्या आत वितरीत करण्याचे कोर्टाचे निर्देश

(High Court on Potholes Deaths) अनेकदा अशा घचना घडल्या ज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाकडून याची दखल घेत महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी.

तसेच, अशाप्रकाराच्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना 50 हजार ते अडीच लाखांपर्यंत भरपाई देण्यात येणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले. ही नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यांच्या आत वितरीत करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. भरपाई जर सहा ते आठ आठवड्यानंतर दिली गेली तर शासकीय संस्थांना नऊ टक्के दराने वार्षिक व्याज आकारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात अनेकदा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहायला मिळत असून रस्त्याचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं आढळल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून खड्डे आढळल्यास त्वरित ४८ तासांच्या आत दुरुस्त केले जातील. तसे न केल्यास जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com