Onion Scam Inquiry : नाफेड–एनसीसीएफ कांदा खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Onion Scam Inquiry ) नाफेड–एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाकडून आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. १६ जानेवारी २०२६ पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश देण्यात आले असून नाफेड, एनसीसीएफ, एफपीसी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत पोलिसांत विश्वास मोरे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ही कारवाई असून १० वर्षांत तब्बल ५,००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खुल्या बाजारातून खरेदीची शेतकऱ्यांची मागणी धुडकावली असून एफपीसीमार्फत खरेदीला प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्व चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Summery
नाफेड–एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशीचे हायकोर्टाचे आदेश
१६ जानेवारी २०२६ पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश
नाफेड, एनसीसीएफ, एफपीसी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप
