Murlidhar Mohol : इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Murlidhar Mohol) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. गुरुवारी कंपनीने तब्बल ५५० उड्डाणे रद्द केली.केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
इंडिगोच्या सेवेत झालेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. DGCA च्या FDTL आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार
मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहितीॉ
इंडिगोच्या सेवेतील अडचणींमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय
