महत्वाची बातमी! पुण्यातील 'या' भागातील शाळांना सुट्टी
Google

महत्वाची बातमी! पुण्यातील 'या' भागातील शाळांना सुट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

महत्वाची बातमी! पुण्यातील 'या' भागातील शाळांना सुट्टी
पुणेकरांनो लक्ष द्या! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त 'या' वाहतूक मार्गात बदल

पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. मोदी वाहनाने रस्तेमार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याअनुषंगाने पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आवश्यक ते वाहतूक मार्गात बदल करण्यात आलं आहेत.

वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक शाळा-महाविद्यालयांनी उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यवर्ती भागाबरोबरच कॅम्प, डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील काही शाळांनाही सुट्टी जाहीर देण्यात आली आहे.

दरम्यान, दहशतवादी कृत्य करण्याच्या इराद्याने पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच पकडले. त्याचवेळी एनआयएने डॉ. अलनान अली सरकार यालाही अटक केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com