Homeopathic Doctor
Homeopathic Doctor

Homeopathic Doctor : आजपासून आझाद मैदानात होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Homeopathic Doctor ) होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत. 'IMA'च्या तीव्र विरोधामुळे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने 30 जूनला जो निर्णय घेतला होता तो मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहिण्याची अनधिकृत परवानगी नाकारण्यात आली आहे. 

राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात जो नवीन निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा, यासाठी ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला होता. CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी होऊन ॲलोपॅथी पद्धतीचे काही प्रमाणात उपचार करण्याची परवानगी सुरुवातीला देण्यात आली होती. मात्र IMA आणि इतर वैद्यकीय संघटनांनी गंभीर विरोध दर्शवला.

होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम सुरू केला होता. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 15 जुलैपासून ही नोंदणी करण्यात येणार होती ; मात्र अचानकपणे या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने याच पार्श्वभूमीवर होमिओपॅथी डॉक्टर आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र युनायटेड होमिओपॅथिक डॉक्टर्स फ्रंटच्या माध्यमातून हे उपोषण करण्यात येणार आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com