वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना मार्चअखेरपर्यंतचे मानधन मिळणार येत्या आठ दिवसांत

वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना मार्चअखेरपर्यंतचे मानधन मिळणार येत्या आठ दिवसांत

Published by :
Published on

राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे 28 हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्चअखेरपर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली. राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्यशासनाकडून ही योजना 1955 पासून राबविण्यात येते. अलीकडेच या साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250) मानधन दरमहा अदा करण्यात येते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com