Supriya Sule : टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे वसतीगृह प्रवेश रद्द; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Supriya Sule : टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे वसतीगृह प्रवेश रद्द; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे वसतीगृह प्रवेश रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे वसतीगृह प्रवेश रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 5 वर्षे पूर्ण झाल्याने वसतीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे पीएचडी करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने वसतिगृह सोडण्यास सांगितले आहे. यासाठी हे विद्यार्थी पाच वर्षांहून अधिक काळ तेथे राहिल्याचे कारण देण्यात आले आहे.

परंतु प्रत्यक्षात दोन अडीच वर्षे कोरोनाच्या काळात गेली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पीएचडी पुर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता अनेक विद्यार्थी अंतिम सबमिशनच्या तयारीत असताना त्यांना तातडीने वसतिगृह सोडण्यास सांगणे अन्यायकारक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रशासनाने हा मुद्दा देखील विचारात घेणे गरजेचे आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com