Ajit Pawar : "कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो..." अजित पवार असं का म्हणाले?
( Ajit Pawar ) अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्यावेळी एका व्यक्तीने अजित पवार यांना प्रश्न विचारला की, "शहरातील नदी लगतची, दुर्गा देवी टेकडी वरची झाडे तोडली जाणार आहेत. शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे आपण पालकमंत्री आहात. ही वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची."
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटायला लागलं आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीचं घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश करायचा." असे अजित पवार म्हणाले त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.