Ayodhya Ram Mandir: अयोध्येत कसे होणार श्री रामलल्लाचे दर्शन? कशी असेल सुविधा जाणून घ्या...

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत कसे होणार श्री रामलल्लाचे दर्शन? कशी असेल सुविधा जाणून घ्या...

भव्य राम मंदिराच्या उभारणी आणि अभिषेक सोहळ्याशी संबंधित काम वेगाने पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

भव्य राम मंदिराच्या उभारणी आणि अभिषेक सोहळ्याशी संबंधित काम वेगाने पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर रामानंदी परंपरेनुसार रामललाची पूजा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रामललाच्या दर्शनासाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (SRJTKT), (srjbtkshetra.org) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमची तिकिटे बुक करू शकता. याशिवाय तुम्ही तिथे गेल्यानंतर तिकीट काढाणार असाल तर तुम्ही अयोध्या राम मंदिर अभ्यागत केंद्रात जाऊन तिकीट ऑफलाइन मिळवू शकता. ऑफलाइन तिकिटाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. त्यामुळे या वेळत तुम्ही तिकिट घेऊ शकता.

दर्शनाची वेळ

अयोध्या राम मंदिरात रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन वेळा जाऊ शकता. सकाळी 6 ते 11.30 पर्यंत मंदिरात दर्सश सुरू असेल तर त्यानंतर दुपारी 2 ते 7 या वेळेत तुम्ही दर्शन घेऊ शकता. सण आणि उत्सवाच्या काळात दर्शनाच्या वेळा बदलू शकतात.

राम मंदिरात आरतीची वेळ

अयोध्या राम मंदिरात दिवसातून एकूण तीन वेळा रामललाची आरती केली जाईल. यामध्ये शृंगार आरती, भोग आरती आणि शयन आरती अशा तीन आरती होतील. या तिन्ही आरत्यांची वेळ पुढीलप्रमाणे आहे. शृंगार आरती सकाळी 6.30 वाजता होईल, तर रात्रिभोज आरती दुपारी 12:00 वाजता होईल. यानतंर संध्या आरती सायंकाळी 7:30 वाजता होईल.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत कसे होणार श्री रामलल्लाचे दर्शन? कशी असेल सुविधा जाणून घ्या...
SSC-HSC Exam Update: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्डाने केला 'हा' बदल

दरम्यान, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, भाविकांना दर्शनस्थळी प्रसाद घेता येणार नाही. दर्शन घेऊन परतत असताना दर्शन मार्गाजवळील उद्यानातून त्यांना प्रसाद मिळेल. दर्शन सुलभ आणि जलद व्हावे यासाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com