धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीनीने उचललं टोकाचे पाऊल

धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीनीने उचललं टोकाचे पाऊल

कोल्हापूर येथील घटना

कोल्हापूर : एचएससी बोर्डाचा बारावी सायन्सचा पेपर अवघड गेल्याने १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. लिया रुकडीकर असे या मुलीचे नाव आहे. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथल्या समर्पण कोरे नगरात घडली. याप्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.

धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीनीने उचललं टोकाचे पाऊल
घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केले मालकाच्या घरातून लाखोंचे दागिने लंपास

करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरातील समर्पण कोरे नगरात रुकडीकर कुटुंबीय राहतात. अमित रूकडीकर हे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी लिया ही मंगळवार पेठेतील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. रुकडीकर यांची कन्या लिया ही सायन्समधून बारावीचं शिक्षण घेत होती. सध्या एचएससी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. सोमवारी झालेला पेपर अवघड गेल्याने लिया रुकडीकर ही तणावात होती. आज सकाळी तिची आई आणि वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. छोटा भाऊ देखील शाळेला गेला होता. घरी आजी आणि लिया असे दोघेजण होते.

दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लियाचे वडील अमित रुकडीकर हे घरी आले. त्यांनी लियाला साद घातली. पण तिच्या खोलीतून प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यांनी खिडकीतून पाहिले. त्यांना संशय आल्यान त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि दरवाजा तोडण्यास सांगितलं. त्यावेळी लियाने सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आलं. या सर्वांनी तिला खाली उतरून तात्काळ सीपीआरमध्ये दाखल केलं. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितलं. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com