Delhi Blast
Delhi Blast Delhi Blast

Delhi Blast : मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारचा मोठा स्फोट; पंतप्रधान मोदी पहिला प्रतिक्रिया...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे, एक्स पोस्टमध्ये मोदी लिहितात की,....
Published by :
Riddhi Vanne
Published on

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली आहे. स्फोटानंतर कारला आग लागली आणि शेजारील काही वाहनांनाही पेट घेतला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. स्फोटाचा आवाज 200 ते 300 मीटरपर्यंत ऐकू गेला, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेनंतर पोलिस, अग्निशामक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सायंकाळी सुमारे 6.45 वाजता हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार मुंबई आणि पुणे शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा तैनात वाढविण्यात आला असून, वाहतूक आणि मेट्रो स्थानकांवर कसून तपासणी सुरू आहे. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड की घातपात, याबाबत चौकशी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे, एक्स पोस्टमध्ये मोदी लिहितात की, "आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com