‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ , महापुरात देखील केले लग्न

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ , महापुरात देखील केले लग्न

Published by :
Published on

राज्यात पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला चांगलाच फटका बसला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच लोक या संकटाचा सामना करत असताना लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सांगलीतून व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लग्नाचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीमध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे. घर, दुकानंही पाण्याखाली गेली आहेत. एवढ्या पाण्यातून आपल्या नवरीला घरी कसं आणायचं म्हणून युक्ती लढवत नवरदेवानं बोट मागवली आणि वरात काढली.

अन् आपल्या नवरीला घरी घेऊन आला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला सोशल मीडियावरुन भरपूर प्रतिसाद आलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर खूप सारे मीम्सही बनवण्यात येत आहेत.

या व्हिडीओवर चांगल्या, वाईट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. हा व्हि़डीओ शेअरही करण्यात येत आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लग्नाचे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात.

दरम्यान, राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com