पाकिस्तान ‘तो’ झेल घेतला असता तर…मॅथ्यू वेड म्हणाला

पाकिस्तान ‘तो’ झेल घेतला असता तर…मॅथ्यू वेड म्हणाला

Published by :
Published on

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियामधला गुरूवारचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात केली.या विजयात मॅथ्यू वेडच्या फलंदाजीची जितकी चर्चा सूरू आहे तितकीच चर्चा हसन अलीच्या हातून सुटलेल्या झेलची होत आहे. हा सुटलेला झेल सामन्याचा निकाल पालटू शकला असता. दरम्यान या झेलवर आता ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने प्रतिक्रिया दिली आहे.

सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात केली. दरम्यान 19 व्या षटकात पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल सोडला आणि हाच झेल ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे कारण बनला. मात्र पाकिस्तानने जरी हा झेल पकडला असता तरी देखील आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅचनंतर ज्याचा झेल सुटला तो ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने दिली आहे.

माझा झेल जरी घेतला असता तरी आम्ही तेव्हा मजबूत स्थितीमध्ये होतो. जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडला नसता आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com