महाराष्ट्र
विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा
योगगुरू बाबा रामदेव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असून राष्ट्रवादी काँग्रेसनंही आता रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे. 'विना डिग्रीचा कोणी डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबांना हाणला आहे.
ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही, तो लोकांना उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात, मात्र, आपले दुकान व व्यवसाय चालवण्यासाठी ते वक्तव्य करत असतील तर हे चुकीचं आहे,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.