Illegal Banner Case : बेकायदेशीर फलक प्रकरण; उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेवर ओढले ताशेरे
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Illegal Banner Case ) बेकायदा फलक प्रकरणी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले असून अनेकवेळा विचारून सुद्धा ठाणे महापालिकेने आकडेवारी सादर केली नाही.
त्यामुळे आता जर पुढच्या सुनावणीत आकडेवारी सादर केली नाही तर आयुक्तांना हजर राहावे लागेल असे सांगण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. बेकायदा फलक प्रकरणी किती गुन्हे आणि दंड वसूल केला यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून अनेकदा विचारणा करण्यात आली
मात्र ती आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. लातूर महापालिकेने केलेल्या उपाय योजनांचे न्यायालयाने यावेळी कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.
Summery
बेकायदेशीर फलक प्रकरण
उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेवर ओढले ताशेरे
लातूर महापालिकेच्या उपाययोजनेवर न्यायालयाकडून कौतुक
